वैनगंगा
वैनगंगा : मध्य प्रदेश राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक प्रमुख नदी व गोदावरीची उपनदी. लांबी सु. ५८० किमी. महानदी, शोण, नर्मदा, तापी यांसारख्या अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या मध्य भारतातील पूर्व-मध्य उच्चभूमी प्रदेशातच वैनगंगेचाही उगम होतो.